04 June 2020

News Flash

अलिबागमधील संगीता शृंगार सेंटरला आग

शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

अलिबाग शहरातील पीएनपीनगरमधील  संगीता शृंगार सेंटरला रविवारी पहाटे अचानक आग लागली. या आगीत दुकानातील सुमारे दहा लाख रुपयांचा माल जळून खाक झाला. सुदैवाने जीवितहानी टळली. आगीचे कारण समजले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अलिबाग तालुक्यातील सहाणगोठी येथील जयदीप शंकर तुणतुणे यांच्या मालकीचे पीएनपीनगर येथील एका इमारतीमध्ये तळमजल्यावरील गाळ्यामध्ये संगीता शृंगार सेंटर नावाचे दुकान आहे. ५ जून रोजी पहाटे ४ ते ४.३० वाजण्याच्या सुमारास अचानक दुकानाला आग लागली. हळूहळू आग वाढू लागली. ही बाब दुकानाच्या मालकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी धाव घेतली. पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती अलिबाग पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. अलिबाग नगर परिषद  व आरसीएफ कंपनीच्या अग्निशमन दलाने तब्बल दोन तास प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.  या आगीमध्ये कॉस्मेटिक व इतर जनरल साहित्य, तसेच टेलिरगचे मटेरियल्स, फॉल बिडिंगच्या साडय़ा व दुकानातील अन्य काही वस्तू जळून खाक झाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2016 2:18 am

Web Title: fire at sangeeta shrungar center in alibaug
टॅग Fire
Next Stories
1 पाऊस लांबल्याने पाणीटंचाईग्रस्त वाडय़ांची संख्या दोनशेवर
2 कोकण विभाग राज्यात अव्वल
3 सिंधुदुर्गचा दहावीचा निकाल ९७.४६ टक्के
Just Now!
X