03 December 2020

News Flash

सांगलीतील आनंद टॉकिजसमोर भीषण आग

अग्निशमन दलाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात

सांगली शहरातील मारुती रोडवर असलेल्या आनंद टॉकिजसमोर मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत एक बेकरी दोन दुकानं जळून खाक झाली. आजूबाजूची घरंही या आगीत भक्ष्यस्थानी पडली आहेत. अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले. अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. या आगीत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र या आगीत लाखोंचं नुकसान झालं आहे. ही आग नेमकी का लागली ते स्पष्ट झालं नाही.

आनंद टॉकिजसमोर ही आग लागताच लोकांची एकच खळबळ उडाली. अनेकजण आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत होते. अनेकजण सैरावैरा पळू लागले. आगीमुळे एकच हलकल्लोळ माजला होता. ही आग नेमकी का लागली ते अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान अग्निशमन दलाने माहिती मिळताच घटनास्थळी पोहचून अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली. मात्र बराच काळ या भागात आगीचे लोळ आणि धुराचे लोट पाहण्यास मिळाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2019 9:44 am

Web Title: fire at sangli near anand talkies scj 81
Next Stories
1 शिवसेनेने आदित्य ठाकरेंसाठी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे : रामदास आठवले
2 महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री आणि शिवसेनेचा उपमुख्यमंत्री?
3 नगरच्या राजकारणात विखे एकाकी, मंत्रिपदाला भाजपातूनच विरोध सुरु
Just Now!
X