पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आवाहन केल्यानंतर आज देशवासीयांनी घराघरात दिवे पेटले होते. मात्र सोलापूरात काही अतिउत्साहींनी फटाके देखील फोडले. त्यामुळे सोलापूर विमानतळावर परिसरातील काही भागात आग लागल्याची घटना घडली आहे.  स्थानिक उत्साही मंडळींनी फटाके फोडताना ठिणग्या गवतावर पडल्यामुळे आग लागल्याचे विमानतळावरील एका सुरक्षा रक्षकाने सांगितले. त्यामुळे घटनेची माहिती मिळताच सोलापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाचे पाच पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. परंतु अद्यापही आग आटोक्यात आली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटे घरातील लाइट्स बंद करून दिवे लावावे किंवा मोबाइल बॅटरी सुरू करावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत आज देशवासीयांनी घराघरात दिवे पेटले होते. अनेकांनी मोबाइलचे फ्लॅशलाइट्स सुरू केले होते. मात्र काही ठिकाणी या उपक्रमाला गालबोट लागल्याचे दिसून आले. संपूर्ण देशाला केले होते. त्यांच्या या आवाहनाला रविवारी रात्री ९ वाजता देशवासीयांना उत्तम प्रतिसाद दिला. घराघरात दिवे पेटले होते. अनेकांनी मोबाइलचे फ्लॅशलाइट्स सुरू केले होते.