22 January 2018

News Flash

वाळूज एमआयडीसीतील भंगार गोडाऊन जळून खाक

तीन तासांनी आग आटोक्यात

औरंगाबाद | Updated: January 12, 2018 7:18 PM

वाळूंज एमआयडीसी भागात असलेल्या भंगार गोडाऊनला आग लागली होती जी आटोक्यात आली. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

औरंगाबाद शहरातील वाळूज एमआयडीसीमध्ये एका भंगार गोडाऊनला आग लागली. तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. मात्र या आगीत भंगार गोडाऊन जळून खाक झाले. औरंगाबादच्या पंढरपूर चौकात असलेल्या भंगार दुकानात अचानक आग लागली. आगीची ही घटना काही लोकांना लक्षात येतात त्यांनी यासंदर्भातली मााहिती अग्निशमन दलाला कळवली आणि आग नियंत्रणात आणण्यासाठी त्यांना बोलावले. काही वेळातच वाळूज अग्निशमन दलाचे २ बंब या ठिकाणी आले मात्र तोवर आगीने रौद्ररूप धारण केले होते.

पदमपुरा अग्निशमन दलाचाही एक बंब बोलावण्यात आला. तीन बंबांच्या मदतीने आणि तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग अखेर आटोक्यात आली. मात्र तोवर आगीच्या विळख्यात सापडून भंगार गोडाऊन आणि इतर साहित्य जळून खाक झाले. नेमके किती रूपयांचे नुकसान झाले हे समजू शकलेले नाही मात्र हा आकडा लाखोंच्या घरात आहे असा अंदाज वर्तवला जातो आहे. ही आग नेमकी कशी लागली याचे कारण समजू शकलेले नाही. वाळूज एमआयडीसीचे पोलीस या संदर्भातली अधिक माहिती घेत आहेत.

First Published on January 12, 2018 5:36 pm

Web Title: fire at the scrap shop in aurangabad midc
टॅग Aurangabad MIDC
  1. No Comments.