23 March 2018

News Flash

डहाणूतील कासा या ठिकाणच्या विशाल ट्रेडर्स मॉलला भीषण आग

अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटना स्थळी

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: March 14, 2018 7:33 AM

डहाणूतील कासा या ठिकाणी असलेल्या विशाल ट्रेडर्स मॉलला भीषण आग लागली आहे. या मॉलमधून सहा जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. तर एकजण मॉलमध्ये अडकल्याची भीती व्यक्त होते आहे. तेलाचे ड्रम, धान्य गोदाम असल्याने आग आणखी वाढण्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यांच्याकडून आगीवर नियंत्रण आणण्याचे काम सुरु आहे.

विशाल ट्रेडर्स ही दोन मजली इमारत आहे. कासा शहरातील हा मोठा मॉल आहे. पहाटे तीनच्या दरम्यान अचानक आग लागली आग अजूनही भडकलेली आहे. ग्राऊंड फ्लोअरवर मॉल, पहिल्या मजल्यावर गोडाऊन्स आणि दुसऱ्या मजल्यावर रहिवासी घरे या इमारतीत आहेत. आग नेमकी का लागली ते स्पष्ट झालेले नाही. मात्र ही आग नियंत्रणात आणण्याचे कसोशीचे प्रयत्न सुरु केले आहेत.

ही आग नेमकी का लागली ते स्पष्ट झालेले नाही. मात्र आगीत कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. दुसऱ्या दुकानांना आगीची झळ पोहचू नये यासाठीही अग्निशमन दलाकडून खबरदारी घेतली जाते आहे.

First Published on March 14, 2018 7:19 am

Web Title: fire at vishal traders in kasa village dahanu
  1. No Comments.