20 January 2021

News Flash

भंडारा रुग्णालय अग्नितांडव प्रकरण- सरकारकडून चौकशीसाठी समिती स्थापन

दहा बालकांचा मृत्यू झाला.

भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. शॉर्ट सर्किटमुळे झालेल्या या अग्नितांडवात दहा बालकांचा मृत्यू झाला. मन सुन्न करुन सोडणारी ही घटना शनिवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली.

राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत केली आहे. ही समिती शासनाला तीन दिवसात अहवाल सादर करेल. बेफिकिरी दाखवणाऱ्या तसेच दोषी असणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली. माहिती घेण्याबरोबरच मुख्यमंत्र्यांनी घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

काय घडलं?
भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आगीची ठिणगी पडली. शनिवारी रात्री अचानक ही घटना घडली. बॉर्न युनिटमधून धूर निघत असल्याचं रुग्णालयात असलेल्या नर्सच्या निदर्शनास आलं. नर्सने दार उघडून बघितलं असता सगळीकडे प्रचंड धूर झाला होता. नर्सने लागलीच ही माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर सगळीकडे धावपळ सुरू झाली.

माहिती मिळताच अग्रिशामक दलाने रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयातील नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आलं. अतिदक्षता विभागात आउटबॉर्न आणि इनबॉर्न अशी दोन युनिट आहेत. त्यापैकी मॉनिटरमध्ये असलेल्या सात बालकांना वाचवण्यात यश आले. तर आऊट बॉर्न युनिटमधील १० नवजात चिमुकल्यांचा दूर्दैवी मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2021 8:12 pm

Web Title: fire brokeout in bhandara district hospital in children care unit committee form for enquiry dmp 82
Next Stories
1 भंडारा अग्नितांडव प्रकारानंतर ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे महत्त्वाचे विधान, म्हणाले…
2 शरीरसुखाचा आनंद घेताना दोर गळयाभोवती आवळल्याने तरुणाचा मृत्यू, नागपूरच्या लॉजमधली घटना
3 साताऱ्यात तणाव! छत्रपती संभाजी महाराज मार्गाचा बॅनर फाडला; उदयनराजेंनी केलं होतं उद्घाटन
Just Now!
X