येथील शहरातील सात रस्ता भागात मिलियन स्केअर या बहुमजली इमारतीतील सोलापूर इन केबल न्यूज या स्थानिक वृत्तवाहिनीच्या कार्यालयास आज पहाटे अचानक आग लागली. यात संपूर्ण कार्यालय जळून खाक झाले. या आगीत सुमारे पाच कोटींची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. सकाळी सातनंतर महापालिका अग्निशमन यंत्रणेने आग आटोक्यात आणली. जळीत इमारत पाच मजली असून,  सदर घटनेनंतर अशा बहुमजली इमारतीच्या संदर्भात आपत्कालीन व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
(छाया सौजन्याः एएनआय)
fire450