16 October 2019

News Flash

कामायनी एक्सप्रेसच्या जनरल डब्याला आग, जीवितहानी नाही

एक्स्प्रेस पुढच्या स्थानकाकडे रवाना देखील झाली आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

मुंबई कामयानी एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात आग लागल्याचे वृत्त आहे. धूर दिसताच काही प्रवाशांनी ट्रेन मधून उडी मारल्याचे समजते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एक्स्प्रेस पुढच्या स्थानकाकडे रवाना देखील झाली आहे.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार सोमवारी रात्री वाराणसी- मुंबई कामयानी एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात मनमाड स्थानकाजवळ आग लागली. धूर दिसताच काही प्रवाशांनी चेन खेचली आणि ट्रेन थांबवली. भीतीपोटी काही प्रवाशांनी ट्रेनमधून उडी मारली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून ट्रेन पुढील स्थानकाच्या दिशेने रवाना देखील झाली आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे अजून समजू शकलेले नाही.

First Published on April 22, 2019 10:49 pm

Web Title: fire in kamayani express