खोपोलीजवळील साजगाव येथील आर्कोस अद्योगिक नगरीतील रासायनिक उत्पादन करणाऱ्या लघु उद्योग जसनोवा केमिकल मधील रियँक्टरचा जोरादार स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे शेजारील सहा लघु उद्योग आगित भस्मसात झाले आहेत. भीषण आगीत एक ठार तर चार जण जखमी झाले आहेत. रात्री तीनच्या सुमारास झालेला हा स्फोट इतका भीषण होता की, नजीकच्या तीन ते चार किमीपर्यंत आवाज ऐकू गेला.

स्फोटामुळे एक किमी परिसरातील घरांचे व काही कपंन्याच्यां खिडक्या दरवाज्याच्या काचा तुटल्या असून शेड तुटले आहेच. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी होत्या. चार तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानतंर आगीवर नियत्रंण मिळवण्यात आलं.

स्फोटाच्या दणक्याने पेट्रोसोल कपंनीतील सेक्युरिटी गार्डच्या पत्नीचा शेड अंगावर पडून जागीच मृत्यू झाला. तर सेक्युरीटी गार्डसह तीन ते चार जण किरकोळ जखमी झाले. जखमींना खोपोली नगरपरिषद रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्फोटाचा आवाज ऐकताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. शेजारील लघुउद्योगातील अनेक कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.