07 August 2020

News Flash

नांदेडमध्ये चौघांचा आगीत मृत्यू

शहरातील देगलूरनाका परिसरातील रहेमतनगर येथे एका घराला लागलेल्या आगीत रंगकाम करणाऱ्या कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला.

| March 2, 2015 02:37 am

शहरातील देगलूरनाका परिसरातील रहेमतनगर येथे एका घराला लागलेल्या आगीत रंगकाम करणाऱ्या कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी पहाटे घडली. अब्दुल समद शेख हुसेन (वय २६) त्याची पत्नी असमाबेगम अब्दुल समद (वय २३), मुलगा शेख बिलाल (२) अब्दुल समद, मुलगी जोहा (३) अशी मृतांची नावे आहेत. शनिवारी रात्री अब्दुल समद हा आपल्या कुटुंबीयांसह जेवण करून रात्री झोपला होता. कुटुंबीय झोपेत असतानाच त्यांच्या घराला आग लागली. या आगीने घरातील टीव्ही, कुलर व इतर संसारोपयोगी साहित्याने पेट घेतला. याप्रकरणी सिडको ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी नेमकी आग कशामुळे लागली हे अजून स्पष्ट झाले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2015 2:37 am

Web Title: fire killed four in nanded
टॅग Nanded
Next Stories
1 साखर आणि गूळ दोन्हीही घसरले; ‘उसाच्या गोडी’ला दराचा लगाम!
2 नांदेड शहरातील पत्र्याच्या घराला आग; होरपळून चौघांचा मृत्यू
3 मराठवाडय़ात सर्वत्र अवकाळी पावसाने गहू, ज्वारीचे मोठे नुकसान
Just Now!
X