05 July 2020

News Flash

कराडमध्ये गोळीबार, हल्लेखोराला दगडाने ठेचून मारले

कराडमध्ये सोमवारी सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात बबलू माने नावाची व्यक्ती गंभीर जखमी झाली.

| July 20, 2015 11:52 am

प्रातिनिधीक छायाचित्र

कराडमध्ये सोमवारी सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात बबलू माने नावाची व्यक्ती गंभीर जखमी झाली. दरम्यान, या घटनेनंतर माने यांच्या समर्थकांनी घटनास्थळी हल्लेखोरावर केलेल्या हल्ल्यात ती व्यक्ती मृत्युमुखी पडली. हल्लेखोराला लोकांनी दगडाने ठेचून ठार केले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
वैयक्तिक वादातून हा हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बबलू माने यांना दोन गोळ्या लागल्या असून, त्यांच्यावर सध्या कराडमध्ये उपचार सुरू आहेत.
कराडमधील मंडईजवळ सोमवारी सकाळी ही घटना घडली. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या घटनेनंतर कराडमध्ये तणावाचे वातावरण असून, शहरातील पोलीस सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2015 11:52 am

Web Title: firing in karad one person died
टॅग Karad
Next Stories
1 तीच रडकथा!
2 कर्जमुक्तीचे आश्वासन देतानाच गेल्या सरकारच्या नियोजनशून्य कारभाराचे मुख्यमंत्र्यांकडून वाभाडे
3 वनविकास महामंडळाकडील ४० कोटींचे जळावू लाकूड सडले
Just Now!
X