26 February 2021

News Flash

नागपुरात पुन्हा गोळीबार, हल्ल्यात तरुण गंभीर जखमी

संपत्तीच्या वादातून हा हल्ला झाला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या आठवड्यामध्ये नागपुरात गोळीबाराची दुसरी घटना घडली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या शहरात कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. नागपूर शहरात वृद्धावर गोळीबार झाल्याची घटना ताजी असताना सोमवारी अजमेर मटन शॉपचे मालक वसीम मोहम्मद कुरेशी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. नागपूरमधील ओंकार नगर परिसरात दुपारी एकच्या सुमारास दोन अज्ञातांनी ३० वर्षीय वसीम कुरेशीवर हल्ला केला. हल्लेखोरांच्या बंदुकीतून निघालेल्या गोळीमुळे वसीम याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संपत्तीच्या वादातून कुरेशी यांच्यावर हल्ला झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
सहा दिवासांपूर्वी अतिशय गजबजलेली वस्ती असलेल्या गांधीबाग परिसरात एकनाथ धर्माची निमगडे या ७४ वर्षीय वृद्धावर बंदुकीतून पाच गोळया झाडण्यात आल्या होत्या. या वृद्धाचा उपचारादरम्यान मेयो रुग्णालयात मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण शहर हादरले असताना वसीम कुरेशी यांच्यावर झालेला हल्ला नागरिकांचे भय आणखी वाढविणारा आहे. गृहखाते आपल्याकडे ठेवणाऱ्या फडणवीसांना राज्यात पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यामुळे टीकेचा सामना करावा लागत आहे. एकाच आठवड्यात घडलेल्या गोळीबाराच्या दोन घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होऊ शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2016 4:05 pm

Web Title: firing in nagpur
Next Stories
1 शाहिदचा नकार करिनाच्या पथ्यावर
2 सुरेश जैन यांना दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर
3 अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात आयसिसचा प्रवक्ता ठार
Just Now!
X