News Flash

गुन्हे शाखेच्या महिला पोलिसावर गोळीबार

हल्लेखोरांनी एक राउंड गोळी सिद्धवा यांच्या गाडीवर झाडली. सुदैवाने सिद्धवा यात त्या बचवल्या आहेत.

गुन्हे शाखेच्या महिला पोलिसावर गोळीबार
प्रतिनिधिक छायाचित्र

वसई: पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक सिद्धवा जायभाई यांच्यावर शनिवारी रात्री दोन अज्ञात इसमानी गोळ्या झाडल्या.  मुंबई अहमदाबादगुभेगुन्हे महामार्गावर शनिवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास ही घटना घडली. हल्लेखोरांनी एक राउंड गोळी सिद्धवा यांच्या गाडीवर झाडली. सुदैवाने सिद्धवा यात त्या बचवल्या आहेत.

याबाबत माहिती देताना विरार पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विवेक सोनवणे म्हणाले की, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धवा जायभाई आपल्या वाहनातून पालघरच्या  दिशने जात होत्या. रात्री पावणे नऊ च्या सुमारास हॉटेल नॉवेल्टी येथे दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्याच्या गाडीवर एक गोळी झाडली, ती गोळी चुकली आणि सिद्धवा यांच्या गाडीच्या बोनेट ला लागली हल्लेखोरांनी आपल्या चेहऱ्यावर मुखवटा घातला होता आणि काळे जॅकेट परिधान केले होते. त्यांच्या शोधासाठी सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2020 4:10 am

Web Title: firing on crime branch woman officer at mumbai ahmedabad highway zws 70
Next Stories
1 बचतगटाच्या ‘त्या’ दहा महिलांकडून व्यवसायाचा नवा मंत्र
2 येस बँकेशी संलग्न बँकांचे धनादेश एलआयसीकडून परत
3 ‘दिल्ली दंगलीत २५ लाख सैनिकी पोशाखांची विक्री’
Just Now!
X