News Flash

पैशांच्या कारणावरून जामखेडमध्ये एसटी वाहकावर गोळीबार

सुग्रीव जायभाय हे एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत आहेत. पैशांच्या कारणावरून वाद झाल्याने एकाने जायभाय यांच्यावर गोळीबार केला.

पैशांच्या कारणावरून जामखेडमध्ये एका एसटी वाहकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. सुग्रीव गहिनीनाथ जायभाय (वय ४३) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.

पैशांच्या कारणावरून जामखेडमध्ये एका एसटी वाहकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. सुग्रीव गहिनीनाथ जायभाय (वय ४३) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. जायभाय यांच्यावर अहमदनगर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सावकारने गोळीबार करण्यात आल्याचे सांगण्यात येते. पोलीस तपास करत आहेत.

अधिक माहिती अशी, सुग्रीव जायभाय हे एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी एका खासगी सावकाराकडून ५ हजार रूपये व्याजाने घेतले होते. या पैशांच्या कारणावरून वाद झाल्याने संशयित व्यक्तीने जायभाय यांच्यावर गोळीबार केला. यात जायभाय हे जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जायभाय हे एसटी महामंडळाच्या नगर कार्यालयात वाहक म्हणून कार्यरत आहेत. जामखेड पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 12:25 pm

Web Title: firing on st conductor in jamkhed for money transaction
Next Stories
1 ध्वजारोहणावेळी सोलापुरात युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
2 नागपूरमध्ये संघ मुख्यालयात ध्वजारोहण
3 एमपीएससी परीक्षांसाठी एकच ओळखपत्र पुरेसे
Just Now!
X