05 March 2021

News Flash

नागपुरात करोनाचा पहिला बळी

सतरंजीपुरा भाग सील करण्याचे आदेश

प्रतिकात्मक छायाचित्र

नागपुरात ६८ वर्षीय वृद्धाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. नागपुरातला करोनामुळे झालेला हा पहिलाच मृत्यू आहे. या रुग्णाला श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने मेयो रुग्णालयात ४ एप्रिल रोजी दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णाला रुग्णालयात आणण्यात आल्यापासून त्याच्याजवळ कुणीही नातेवाईक आले नाहीत. त्यांचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतरही नातेवाईक आले नाहीत. पोलिसांसह आरोग्य विभागातील कर्मचारी मृत रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीचां शोध घेत आहेत.

हा ६८ सतरंजीपुरा भागातील आहे. त्यामुळे सतरंजीपुरा हा भाग सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाग्रस्तांची देशातली संख्या ही ४ हजाराच्या वर गेली आहे. तर महाराष्ट्रात ही संख्या ८०० च्या वर गेली आहे. रुग्णसंख्या वाढणं हा चिंतेचा विषय ठरतो आहे. करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून १४ एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाउन पुकारण्यात आला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 10:17 pm

Web Title: first death in nagpur due to corona virus scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Coronavirus: पालघर जिल्ह्यात २० लाखांचा सॅनिटायझरचा साठा जप्त
2 Coronavirus: बीडवासियांची धाकधूक संपली; ‘त्या’ २९ पोलिसांच्या चाचण्या निगेटिव्ह
3 Coronavirus आज दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या!
Just Now!
X