रत्नागिरी : उत्परिवर्तित डेल्टा प्लस विषाणूने रत्नागिरी जिल्ह्यात एका ८० वर्षीय महिलेचा १२ दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचे शुक्रवारी निष्पन्न झाले. डेल्टा प्लस या उत्परिवर्तित विषाणूच्या संसर्गाचा हा राज्यातील पहिला बळी आहे.  साथरोगतज्ज्ञ या उत्परिवर्तित विषाणूचा उल्लेख ‘डेल्टा प्लस’ असा करत असले तरी जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या अधिकृत तपशिलात त्याचा उल्लेख ‘व्हेरियंट ऑफ कन्सर्न’ असा करण्यात आला आहे.  रत्नागिरीमध्ये असे ९ रुग्ण सापडले आहेत. चौकशीनंतर संगमेश्वर तालुक्यातील एका महिला रुग्णाचा  मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. उर्वरित ८ जणांची प्रकृती स्थिर आहे.