मतदान केंद्रावर सकाळीच मतदानासाठी येणाऱ्या पहिल्या पाच मतदारांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येणार आहे. सर्वच केंद्रांवर तशी व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, आपापल्या केंद्रावर मतदानाचे साहित्य नेण्याची मतदान अधिकारी-कर्मचाऱ्यांची मंगळवारी लगबग सुरू होती. मतदान केंद्रावर वेळेवर सर्व सोयी उपलब्ध व्हाव्यात, या साठी मंगळवारीच मुक्कामी जाण्याची तयारी सुरू होती.
जिल्हय़ात २ हजार ११३ मतदान केंद्राध्यक्ष, तर ६ हजार ५१८ मतदान अधिकारी आहेत. सरकारच्या वतीने १२ ऑक्टोबपर्यंत घरोघरी जाऊन मतदान ओळखपत्र वाटपाचे ६६.८५ टक्के काम पूर्ण केले. मंगळवापर्यंत हे काम सुरू होते. ज्यांना ओळखपत्र मिळाले नाही, अशा मतदारांसाठी प्रत्येक केंद्रावर स्वतंत्र कक्ष असणार आहे. त्यांना त्याच ठिकाणी त्यांचे ओळखपत्र वितरित केले जाणार आहे.
निवडणूक यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतपत्रिकेचे वाटपही दोन दिवसांपासून सुरू आहे. १२ हजार ५१९ कर्मचाऱ्यांना मतदारसंघनिहाय याचे वाटप होत आहे. जिल्हय़ात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. नऊ पोलीस उपाधीक्षक, १९ निरीक्षक, ९६ सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक, १ हजार ९४० कर्मचारी, १ हजार ९४० होमगार्ड, बीएसएफच्या सहा तुकडय़ा व एसआरपीएफची तुकडी तनात केली आहे.
निवडणूक प्रक्रियेत ११२ शासकीय वाहने अधिग्रहित केली आहेत. यात १५१ एस.टी. बस, ८९ मिनिबसचा समावेश आहे. दारूबंदीचे २२७ खटले दाखल करण्यात आले. १० लाख ६२ हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ९२७ गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले. १ हजार ५५ जणांना अजामीनपात्र, तर १ हजार १४२ जणांना जामीनपात्रचे समन्स बजावण्यात आले. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी, याची सर्व तयारी पूर्ण झाल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग पोले यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, अतिरिक्त जिल्हाधिकारी पुरुषोत्तम पाटोदकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रकाश खपले उपस्थित होते.
ओळखपत्र अनिवार्य
सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान करता येईल. सहा मतदारसंघांत मतदारांना आपले छायाचित्र असलेल्या ११ पुराव्यांपकी किमान एक पुरावा सोबत न्यावा लागेल. ओळखपत्राशिवाय मतदान करता येणार नाही. लोकसभा निवडणुकीत ज्या केंद्रावर मतदान केले होते, त्याच केंद्रावर विधानसभा निवडणुकीतही मतदान असणार आहे. लातूर शहर व लातूर ग्रामीणची मतमोजणी लातूर शहरातील बार्शी रस्त्यावरील शासकीय महिला तंत्रनिकेतनमध्ये होणार आहे. अहमदपूर, उदगीर व निलंगा मतदारसंघांची मतमोजणी संबंधित आयटीआय महाविद्यालयात, तर औसा मतदारसंघाची मतमोजणी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत होणार आहे.
पारंपरिक वाद्य वाजवून मतदारांचे स्वागत होणार
बीडमध्ये २८५ संवेदनशील
केंद्रांवर यंत्रणेची करडी नजर
वार्ताहर, बीड
मतदारांनी उत्साहात मतदान करून लोकशाहीची दिवाळी साजरी करावी, या साठी प्रत्येक मतदारसंघातील ५ केंद्रांवर पारंपरिक वाद्य वाजवून, रांगोळी काढून, अभिवादन करून स्वागत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्य़ात २८५ केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित झाली असून, तेथे चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. ८९ केंद्रांचे चित्रीकरण होणार आहे. निवडणूक विभागाच्या सूत्रांनी ही माहिती दिली.
बीड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभेच्या ६ जागांसाठी उद्या (बुधवारी) मतदान होणार आहे. जवळपास १८ लाख मतदार असून २ हजार १७४ केंद्रांवर मतदान होणार आहे. २८५ केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली. ५८ ठिकाणी सूक्ष्म निरीक्षक, तर ८९  ठिकाणी व्हिडिओ चित्रीकरण, ३६ ठिकाणी वेबकास्टिंग, शिवाय १०२ ठिकाणी केंद्रीय पोलीस दलाचे कर्मचारी तनात राहणार आहेत. कोणत्याही स्थितीत बनावट मतदान होणार नाही, या साठी खबरदारी घेण्यात आल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी सांगितले. ३६ केंद्रांवर काय चालले आहे, याचे थेट प्रक्षेपण जिल्हाधिकारी कार्यालयातील स्क्रीनवर दिसणार आहे. मतदान जागृतीसाठी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी प्रयत्न केले. वृद्ध, अपंग मतदारांचीही सोय करण्यात आली आहे.

Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
12 different products in maharastra received gi tags
तुळजापूरच्या कवड्याच्या माळेसह कोणत्या उत्पादनांना मिळाले जीआय मानांकन? जाणून घ्या सविस्तर…
property tax mumbai
मालमत्ता कर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई, मुंबई महानगरपालिकेचा इशारा