News Flash

ऊस दरासाठीची साखर कारखानदार, ‘स्वाभिमानी’तली पहिली बैठक निष्फळ

राज्यातील ऊस गळीत हंगाम सुरू झाला असताना साखर कारखानदारांकडून एकरकमी एफआरपी देण्यात अडचणी असल्याचा सूर व्यक्त झाल्याने आंदोलन पेटण्याची शक्यता आहे.

(संग्रहित छायाचित्र)

राज्यातील ऊस गळीत हंगाम सुरू झाला असताना साखर कारखानदारांकडून एकरकमी एफआरपी देण्यात अडचणी असल्याचा सूर व्यक्त झाल्याने आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. कारण, रविवारी कोल्हापुरात झालेल्या साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यातील चर्चेची पहिली बैठक फिस्कटली आहे.

कोल्हापूरमध्ये शासकीय विश्रामगृह येथे साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी म्हणून आमदार सतेज पाटील, आमदार प्रकाश आवाडे तसेच काही साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांनी यावर्षीच्या हंगामातील आर्थिक अडचणीत मांडल्या. यावेळी कारखानदारांनी एक रकमी एफआरपी अदा करता येणार नाही. तिचे तुकडे करावे लागतील, असा सूर आळवला.

साखर कारखानदारांची भुमिका विसंगत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील, सावकार मादनाईक, राजेंद्र गड्ड्यांनवर हे बैठकीतून उठून थेट बाहेर पडले, त्यामुळे ही बैठक फिस्कटली आहे.

स्वाभिमानी २३ नोव्हेंबरला जयसिंगपूर येथे राज्यव्यापी ऊस परिषद घेणार आहे. यामध्ये ऊस दराचा निर्णय होणार आहे. इथे ठरणारा दर हाच अंतिम दर असेल असे जालंदर पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तोपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याला ऊस पुरवठा होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. त्यामुळे सुरू झालेल्या साखर कारखान्याच्या गळीत हंगामसमोर अडथळा निर्माण होईल असे दिसत आहे.

दरम्यान, उद्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातील सगळे साखर कारखाने बंद असतील असेही त्यांनी यावेळी सांगितले. आमदार सतेज पाटील बैठकीनंतर म्हणाले, आजची ही प्राथमिक चर्चा होती. यावेळी आम्ही साखर कारखान्याच्या अडचणी सांगितल्या. ऊस परिषद संपल्यानंतर २५ तारखेला पुन्हा एकदा बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2019 3:23 pm

Web Title: first meeting failed between sugar makers and swabhimani dut to sugarcane prices aau 85
Next Stories
1 फुगे फुगवण्याच्या गॅसच्या स्फोटात मुलगी गंभीर जखमी
2 ऊसदरासाठी रविवारी साखर कारखानदार, स्वाभिमानीमध्ये चर्चा
3 ‘सरसेनापती’तर्फे प्रतिटन १०० जादा दर – मुश्रीफ
Just Now!
X