News Flash

चांदोबाचा लिंबमध्ये रंगले माउलींचे पहिले उभे रिंगण

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या भक्तांनी स्वयंस्फूर्तीने लावलेली शिस्तबद्ध उभी रांग..माउलींच्या अश्वांनी घेतलेली दौड..दिंडीतील वारकऱ्यांच्या पायांनी धरलेला ठेका..टाळ-मृदंगांच्या दाटीत रंगलेल्या फुगडय़ा अन हरिनामाचा गजर करीत विठ्ठलाला

| July 19, 2015 01:40 am

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या भक्तांनी स्वयंस्फूर्तीने लावलेली शिस्तबद्ध उभी रांग..माउलींच्या अश्वांनी घेतलेली दौड..दिंडीतील वारकऱ्यांच्या पायांनी धरलेला ठेका..टाळ-मृदंगांच्या दाटीत रंगलेल्या फुगडय़ा अन हरिनामाचा गजर करीत विठ्ठलाला आळवीत भारावलेल्या वातावरणात ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारीच्या वाटेवारील पहिले उभे रिंगण सोहळा चांदोबाचा लिंब येथे उत्साहात पार पडले.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा लोणंद येथील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर हरिनामाच्या गजरात आज दुपारी पुढील प्रवासास मार्गस्थ झाला. माउलीचा लाखो वैष्णवजनांसह खंडाळा तालुक्यातून फलटण तालुक्यात प्रवेश झाला. फलटणच्या कापडगाव येथील सरहद्दीवर फलटण तालुक्याच्या वतीने स्वागत करण्यात आले.
पालखी सोहळ्याने फलटण तालुक्यात प्रवेश केल्यानंतर साऱ्या विठ्ठलभक्त वारकऱ्यांना वेध लागले होते ते उभ्या िरगणाचे. संपूर्ण पालखी सेहळ्यातील पहिले उभे िरगण, िरगणाच्या उत्सुकतेने वारकऱ्यांची पावले भराभर चांदोबाच्या िलबाकडे पडत होती. सोहळा पुढे पुढे सरकत होता. रस्त्यांच्या दुतर्फा असणाऱ्या स्थानिक नागरिकांमधून आनंद व्यक्त केला जात होता. रस्त्याकडील बाजूला असणाऱ्या शेतामध्ये ठिकठिकाणी भारूड रंगली होती.
घर तुटकेसे छप्पर, देवाला देवघर नाही, मला दादला नको गं बाई या संत एकनाथ महाराजांच्या भारुडात वैष्णव दंग झाला होता. भारुडात रंगत येत होती. सोहळा पुढे सरकत चांदोबा येथे आला. या ठिकराणी पंचक्रोशीतील भाविकांनी पहिले उभे िरगण पाहण्यासाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. दरम्यान, माउलीचा रथ चांदोबाचा िलब येथे आला. गर्दी असल्याने िरगण लावताना त्रास होत असला, तरी अखेर पालखी सोहळ्याचे चोपदार यांनी चोप आकाशाकडे धरताच सर्वत्र शांतता पसरली. कोणतीही सूचना न देता वारकऱ्यांच्या गर्दीतून हजारो लाखो वारकरी दुतर्फा झाले व मध्ये अश्व धावत येण्यासाठी जागा ठेवण्यात आली. िरगण लावल्यानतंर रथापुढील २७ िदडय़ांमधून माउलींचा अश्व पुजाऱ्यांनी दौडत आणला. ज्ञानेश्वर माउलींच्या पादुकांचे दर्शन घेऊन अश्व मागील िदडय़ापर्यंत नेल्यानतर माघारी पळत आला. माउलींच्या रथाजवळ अश्व आल्यानंतर सोहळा प्रमुखांनी अश्वास पुष्पहार घालून खारीक-खोबऱ्याचा नवेद्य दाखविला. त्यानंतर अश्वाने दौड घेतली. पुढे माउलींचा अश्व व मागे स्वारीच अश्व अशी दौड पूर्ण झाली. अश्वास प्रत्यक्ष माउलींचा आशीर्वाद असलेल्या भावनेने अश्व ज्या ठिकाणाहून गेला आहे, त्याच्या पायाखालीची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांची एकच गर्दी उडाली होती. अशा तऱ्हेने पालखी सोहळ्यातील पहिले उभे िरगण उत्साहात पार पडले. या नंतर पालखी सोहळा तालुक्यातील पहिल्या मुक्कामासाठी तरडगाव येथील पालखी तळावर स्थिरावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2015 1:40 am

Web Title: first standing circle of mauli palkhi in chandobacha limb
Next Stories
1 संजय ससाणे यांची गोळी झाडून आत्महत्या
2 सिंहस्थ’साठीच्या महाज्योतीची निर्मिती कोल्हापूर जिल्ह्य़ातून
3 राज्यात सर्वाधिक १६० बिबटे
Just Now!
X