News Flash

शनिशिंगणापूर देवस्थानावर प्रथमच दोन महिला विश्वस्त

नगरच्या सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाने बुधवारी श्री शनिशिंगणापूर देवस्थानचे विश्वस्त मंडळ जाहीर केले.

Trupti desai , Shani Shingnapur Temple , HC nod , Maharashtra, loksatta, Loksatta news, marathi, Marathi news
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनि शिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानाचा कारभारही सरकारच्या हाती येणार आहे.

महिलांना दर्शनबंदी असल्यावरून गाजत असलेल्या नगर जिल्ह्य़ातील नेवासे तालुक्यातील शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर यंदा प्रथमच दोन महिलांना स्थान मिळाले आहे. त्याचे अनेकांनी स्वागत केले आहे.

नगरच्या सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाने बुधवारी श्री शनिशिंगणापूर देवस्थानचे अकरा जणांचे विश्वस्त मंडळ जाहीर केले. त्यात अनिता चंद्रहास शेटे व शालिनी राजू लांडे या दोन महिलांसह देवस्थानचे माजी अध्यक्ष रावसाहेब बानकर, माजी विश्वस्त बापूसाहेब शेटे व नानासाहेब बानकर, योगेश बानकर, डॉ. वैभव शेटे, आदिनाथ शेटे, दीपक दरंदले, प्रा. आप्पासाहेब शेटे व भागवत बानकर यांचा समावेश आहे.

शिंगणापूर गावात चोरी होत नाही, त्यामुळे दरवाजा नसलेल्या घरांचे गाव म्हणून ते ओळखले जाते. तसेच देशात प्रसिद्ध असलेल्या शनिदेवाच्या चौथऱ्यावर परंपरेनुसार महिलांना प्रवेशबंदी आहे. या कारणावरून येथे अधूनमधून वादंग होतात.  अलीकडेच एका महिलेने अजाणतेपणाने चौथऱ्यावर प्रवेश केल्याने वादंग उठले होते. या पाश्र्वभूमीवर या पुरातन देवस्थानच्या विश्वस्त मंडळात यंदा प्रथमच महिलांना स्थान देण्यात आल्याने सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत.

देवस्थानच्या मागील विश्वस्त मंडळाची मुदत गेल्या तीन डिसेंबरला संपलीसरकारी नियमानुसार सहायक धर्मादाय आयुक्तांनी नव्या विश्वस्त मंडळाची प्रक्रिया सुरू केली होती. देवस्थानच्या घटनेप्रमाणे स्थानिकांमधून विश्वस्त मंडळ नेमले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2016 4:04 am

Web Title: first time women entering in shani shingnapur temple trust
टॅग : Shani Shingnapur,Trust
Next Stories
1 मुंबईचा सुजन पिलणकर ‘महाराष्ट्र श्री’चा मानकरी
2 रायगडात पाच नगरपंचायतींसाठी १० जानेवारीला मतदान
3 शाळकरी मुलानेच रचला अपहरणाचा बनाव
Just Now!
X