मालवणच्या २० ते २५ वाव खोल समुद्रात कर्नाटक मलपीची मच्छीमारी बोट बुडाली. त्यातील सात खलाशी बुडता बुडता सुखरूप बचावले. संध्याकाळी उशिरा ही बोट किनाऱ्यावर आणण्यात आली.
सिंधुदुर्गच्या समुद्रात परप्रांतीय ट्रॉलर्सधारक धुडगूस घालतात. हे परप्रांतीय खलाशी सिंधुदुर्गच्या समुद्रात येऊन मच्छीमारी करताना रोखण्यातही आले, पण सरकारी यंत्रणेच्या नाकर्तेपणामुळे मच्छीमारीसाठी सिंधुदुर्गच्या समुद्रात घुसखोरी ठरलेली असते.
कर्नाटक राज्यातील मलपी येथील मच्छीमारी नौका सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील मालवण समुद्रात २० ते २५ वाव खोल समुद्रात मच्छीमारी करत असताना समुद्राच्या अजस्त्र लाटांनी बोट हेलखावे खाऊ लागली.
या बोटीत सात खलाशी होते. मच्छीमारी नौकेचे लाटांच्या तडाख्यात हेलकावे पाहून खलाशी सावध बनले. बोटीला जलसमाधी मिळता मिळता खलाशी बुडाले असते, पण सुर्दैवाने सातही खलाशी बुडता बुडता बचावले.
या खलाशांना सुखरूप समुद्रकिनाऱ्यावर आणण्यात आले. नंतर बुडणारी बोटही संध्याकाळी उशिरा किनाऱ्यावर आणण्यात यश मिळाले. मालवण मच्छीमारांच्या ट्रॉलर्स काल जळाल्या होत्या आणि आजच्या दुसरा प्रसंगात मच्छीमारांनी सेवाभावी वृत्ती ठेवून धाव घेतली.
रात्री उशिरापर्यंत कर्नाटक, मलपी खलाशी व बोट सुखरूपबाबत कार्यवाही सुरूच होती.