मासेमारी बंदीचा परिणाम

पावसाळ्याच्या कालावधीत खोल समुद्रातील मासेमारीला बंदी असते. त्यामुळे मच्छीमार बोटी सध्या् किनाऱ्याला लागल्या आहेत . मात्र मासे मिळत नसल्यातने खवय्यांचे मात्र चांगलेच हाल झालेत . मासळी बाजारांमध्येल नेहमीच्यो तुलनेत खूपच तुरळक गर्दी आहे.

कोकणी माणूस म्हाणजे समुद्रातील चवदार माशांचा खवयया. परंतु पावसाळयाच्याण सुरूवातीचा  कालावधी हा माशांचा प्रजननाचा काळ असतो.  १ जूनपासून राज्यात खोल समुद्रातील मासेमारीवर बंदी घालण्यापत आली आहे. मचछीमार बांधवांनी आपल्या होडया किनाऱ्यावर उभ्या केल्या  आहेत . त्यामुळे मासळीची आवक कमी झाली आहे . छोटया होडय़ा किनारी भागात किंवा खाड्यांमध्ये मासेमारी करताना दिसत आहेत . परीणामी किनाऱ्यांजवळ किंवा खाडीतील मासे सध्या उपलब्ध उपलब्ध असून बाजारात मासळीचे भाव गगनाला भिडले आहेत . बाजारातील मासळीचे दर ऐकून अनेकजण आल्यापावली पर फिरत आहेत . मासे खाणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे झाले आहे. मासळी बाजारातील गर्दीही कमी झाल्याने रोजचा कोलाहल ऐकायला मिळत नाही. मासे परवडत नसल्याने ग्राहकांनी आता चिकन मटण किंवा सुक्यास मासळीकडे आपला मोर्चा वळवला आहे . त्यामुळे चिकन मटणाच्या दुकानात गर्दी झालेली पहायला मिळते आहे . काहीजण उन्हाळयात साठवून ठेवलेल्या सुका जवळा , सोडे , वाकटया , सुके बोंबील यांचे कालवण करून आपल्या जीभेचे चोचले पुरवत आहेत . दुसरीकडे चांगले चवदार आणि स्वस्त मासे खाण्यासाठी आणखी दीड महिना तरी वाट पहावी लागणार आहे.

बाजारात आलो होतो पण मासळी कमी आहे आणि दर पाहून डोळे फिरले . या दराने मासे घेणे परवडणारे नाही. शेवटी थोडी खाडीची मच्छी घेतली असे अरूण घासे यांनी सांगितले तर या दिवसात सुकी मासळीच परवडते .असे संतोष दळवी यांनी सांगितले .

सध्याचे बाजारातील मासळीचे दर

  • पापलेट – ५०० ते ७०० रूपये जोडी
  • सुरमई मोठी – ६०० रूपये नग
  • सुरमई छोटी – ४०० रूपये नग
  • कोळंबी -६०० रूपये मोठा वाटा