News Flash

माश्यांची आवक घटली, दर वाढले..

हवामानातील बदलांचा कोकणातील मासेमारीला फटका बसला आहे.

हवामानातील बदलांचा कोकणातील मासेमारीला फटका बसला आहे. किनारपट्टीवर मासे मिळेनासे झाले आहेत. तर दुसरीकडे बाजारात माश्यांची आवक घटल्याने दर मात्र चांगलेच वाढले आहेत.

समुद्रात येणारी भागांची भरती, अवेळी पडणारा पाऊस, वाढलेली थंडी, वारा तसेच सतत बदलत असलेले वातावरण, किनारपट्टीवर एलईडी लाईट आणि पर्ससिन बोटींच्या साह्याने केली जाणारी अनियंत्रित मासेमारी यामुळे कोकणातील मासेमारी व्यवसाय सध्या अडचणीत सापडला आहे. किनारपट्टीवरील भागात मासे मिळेनासे झाले आहेत. खोलसमुद्रात जाऊनही फारसे मासे मिळत नाही. त्यामुळे माश्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे.

त्यामुळे मच्छिमार आíथक संकटात सापडला आहे. दुसरीकडे बाजारात माश्यांची आवक घटल्याने दर मात्र भडकले आहेत. पापलेट ५०० ते ७०० रुपयाला मिळणारे पापलेट १ हजार ५०० रुपयांना मिळत आहेत. तर ४०० ते ५०० रुपयांना मिळणारी सुरमई आता दिड ते दोन हजार रुपयांना विकली  जात आहे. बांगडा, बोंबिल, माकुळ, कोलंबी, शेवंड या माश्यांच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे खवय्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. चढ्या दरांमुळे माश्यांना उठाव मिळत नसल्याने मच्छी विक्रेतेही अडचणीत सापडले आहेत.

‘मच्छी सध्या समुद्रात मिळत नाही. त्यामुळे कोळी बांधवांचे अर्थकारण कोलमंडले आहे. विदर्भ, मराठवाडा याठिकाणी दुष्काळग्रस्त शेतकरयांसाठी पॅकेज शासन जाहीर करते. मात्र कोळी बांधवाना अद्यापही मच्छी दुष्काळा साठी कोणतेही पॅकेज जाहीर केलेले नाही. आताच्या परिस्थितीत कोळी बांधव आíथक संकटात असून शासनाने मच्छीचा दुष्काळ जाहीर करून आíथक मदत द्यावी.’  – मनोहर बले, मच्छिमार नेते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2019 12:07 am

Web Title: fishing in maharashtra 3
Next Stories
1 माघ वारीत प्रशासनाचा भोंगळ कारभार
2 कुंभमेळ्याहून नागपूरला परतणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात; चार ठार
3 कार्यकर्त्यांबद्दलच्या अविश्वासाने पवारांकडून घरातच उमेदवारी
Just Now!
X