अनेक वर्षांपासून अडगळीत पडलेली राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी महाविकास आघाडी सरकारच्या काळात निकाली निघाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अमलबजावणी २९ फेब्रुवारीपासून केली जाणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयावर टीकाही करण्यात आली होती. सरकारी कार्यालयात लोकांना आणखी खेटे मारावे लागली, असाही एक सूर उमटला होता. मात्र, पाच दिवसांचा आठवडा करताना सरकारनं कामाचा वेळ वाढवला आहे. त्यामुळे नागरिकांना सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत सरकारी कार्यालये उघडी राहणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरकारकडून जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयात यासंदर्भातील संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. सकाळी ९.४५ वाजता कार्यालये सुरू होणार असून, सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. शिपायांसाठी वेगळी कार्यालयीन वेळ आहे. शिपायांना ९.३० वाजता कार्यालयात हजर व्हावे लागणार असून, ६.३० वाजेपर्यंत थांबाव लागणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five day week new schedule for government employees bmh
First published on: 25-02-2020 at 13:27 IST