News Flash

श्रीरामपूरला तीन वाहनांच्या भीषण अपघातात पाच तरूणांचा जागीच मृत्यू

बेलापूर-श्रीरामपूर रस्त्यावर बेलापूर खुर्दजवळ अपघात

प्रतिकात्मक छायाचित्र

बेलापूर-श्रीरामपूर रस्त्यावर बेलापूर खुर्दजवळ बुधवारी रात्री सव्वा बारा वाजता तीन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात पाच तरुणांचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.

शिवा ढोकचौळे (वय २७), नितीन सोनवणे (वय २७, दोघेही रा. रांजणखोल, ता. राहाता), सुभाष शिंदे (वय ३०, ब्राह्मणगाव वेताळ, ता. श्रीरामपूर), सचिन तुपे (वय २८), भारत मापारी (वय २७, दोघेही रा. भैरवनाथनगर, ता. श्रीरामपूर) अशी मृतांची नावे आहेत. तर पीयूष पांडे (रा. भैरवनाथनगर) हा या अपघातात जखमी झाला आहे.

हे सर्वजण स्विफ्ट कारमधून (एमएच १७ एसी ९००९) पार्टीसाठी देवळाली प्रवरा येथे गेले होते. तेथून परतत असताना बेलापूर खुर्द येथे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार उलटून समोरुन येणाऱ्या टँकरवर (एमएच ०४ आर ९६६६) आदळली. त्याचवेळी भरधाव वेगाने येणारी इंडिका कारही (एमएच १७ ६०५५) या कारवर येऊन आदळली. यात स्विफ्ट कारमधील पाच जण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाला. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2017 2:29 pm

Web Title: five dead in road accident on belapur shrirampur road
Next Stories
1 जिल्हा परिषदेच्या तिजोरीवर रोखपालाचा दरोडा; शासकीय योजनांचे १२ लाख रूपये लंपास
2 महावितरणच्या ‘कृषी संजीवनीत’च अंधार!
3 विदर्भातील पदयात्रेचा राष्ट्रवादीला राजकीय लाभ किती?
Just Now!
X