19 January 2021

News Flash

महाराष्ट्रातल्या पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

5 जून रोजी बदल्या झालेल्याअसतानाच आणखी ५ जणांच्या बदल्या

राज्यातल्या पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. खरे तर ५ जून रोजीच १७ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र दोनच दिवसात आणखी पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मिलिंद म्हैसकर हे मुख्यमंत्र्याच्या स्वीय सचिवपदी काम करत होते. त्यांना आता मुंबई म्हाडाचं उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी हे पदही  देण्यात आले आहे.

डी. बी. गावडे यांना नाशिकच्या आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्तपद देण्यात आले आहे. डी. बी गावडे हे याआधी अहमदनगर महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहात होते. अहमदगनर महापालिकेच्या आयुक्तपदी आता जी.सी. मांगले यांची वर्णी लागली आहे. मांगले हे याआधी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. व्ही. व्ही माने यांना अहमदनगर महापालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद देण्यात आले आहे. तर रविंद्र बिनवडे यांना नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नेमण्यात आले आहे. बिनवडे हे आधी अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहात होते. अशा एकूण पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2017 7:44 pm

Web Title: five ias officers transfer in state
Next Stories
1 …वेळ पडल्यास उदयनराजेंना अटक करू-नांगरे पाटील
2 Farmers Strike : संपूर्ण कर्जमाफीसाठी शिवसेनेच्या महिलांनी केले मुंडन, केस मुख्यमंत्र्यांना पाठवणार
3 शेतकरी संप राज्यव्यापी कसा झाला ?
Just Now!
X