News Flash

बीड : पांगरबावडी जवळील भीषण अपघात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

पाच गंभीर, मृतामध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश

प्रातिनिधिक छायाचित्र

वडवणीकडून बीडकडे येणार्‍या रिक्षाला ट्रकने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाच जण जागीच ठार तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार घडली. बीड-परळी रस्त्यांवर पांगरबावडी येथे हा अपघात झाला. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश असून ते सर्व बीड शहरातील शाहुनगरमधील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे.

बीड ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडवणी येथून प्रवाशी रिक्षा बीडकडे प्रवाशी घेवून येत होता. रिक्षा पांगरबावडी जवळ आल्यानंतर बीडकडून वडवणीकडे जाणार्‍या ट्रक (क्र.एन. एच. 09 सी.व्ही. 9644) ने रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले. या घटनेची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेत जखमींना नागरिकांच्या मदतीने तात्काळ उपचारासाठी पाठवले.

दरम्यान, याच ट्रकचालकाने घोडका राजूरी येथे आणखी एका दुचाकीला धडक दिल्याने दोन जण जखमी झाल्याचे सांगितले जाते.

तबसुम अकबर पठाण, सारो सत्तार पठाण, रिहाण अबजान पठाण (वय १३), तम्मना अबजान पठाण (वय १०) मदिना पठाण यांचा या अपघात मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2021 1:01 am

Web Title: five members of the same family die in a tragic accident near pangarbawdi abn 97
Next Stories
1 मजुरांच्या घरात मालमोटार शिरल्याने दोघांचा मृत्यू ; चार जण जखमी
2 “लवकरच काँग्रेस सत्तेतून बाहेर पडेल आणि…”
3 Coronavirus : राज्यात आज ११ हजार १४१ करोनाबाधित वाढले, ३८ रुग्णांचा मृत्यू
Just Now!
X