News Flash

वाशिम जिल्ह्यात आणखी पाच रुग्ण

सध्या १८ रुग्णांवर उपचार सुरु

प्रतिकात्मक छायाचित्र

लोकसत्ता प्रतिनिधी

अकोला : वाशीम जिल्ह्यात करोनाबाधित आणखी पाच रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या २६ झाली. सध्या १८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

वाशिम तालुक्यातील बोराळा हिस्से येथील एका ५६ वर्षीय रुग्णाचा करोना चाचणी अहवाल आज सकारात्मक आला आहे. बोराळा हिस्से येथील करोनाबाधित युवकाच्या संपर्कात आल्याने त्यांना लागण झाली. दिल्ली येथून कारंजा लाड तालुक्यातील सुकळी येथे आलेल्या व ‘आयएलआय’ लक्षणे असलेल्या एकाच कुटुंबातील ३२ वर्षीय पुरुष, २४ वर्षीय महिला व दोन वर्षीय बालिकेचा करोना तपासणी अहवाल सकारात्मक आला आहे.

कारंजा लाड येथील एका ५३ वर्षीय व्यक्तीला सुद्धा करोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या रुग्णाला करोना संसर्गाची लक्षणे असल्याने खासगी रुग्णालयातून पाठविण्यात आले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2020 9:15 pm

Web Title: five more corona positive patients in washim scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 अकोल्यात करोना रुग्णांच्या संख्येने ओलांडला नऊशेचा टप्पा
2 बुलडाणा जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या १०० च्याही पुढे
3 कोल्हापूर : कबनूरमध्ये सरपंचांच्या दालनात आणून टाकली मृत डुक्करं
Just Now!
X