28 October 2020

News Flash

कोसमी-किसनेली जंगल परिसरात सहा नक्षलवादी ठार

सी ६० च्या जवानांवर केला होता नक्षल्यांनी हल्ला

संग्रहीत छायाचित्र

गडचिरोलीच्या धानोरा परिसरात असलेल्या कोसमी-किसनेली जंगलात सी ६० च्या जवानांनी सहा नक्षलवाद्यांना ठार केलं आहे. हे जवान नक्षलविरोधी कारवाई करत असताना त्यांच्यावर काही नक्षल्यांनी हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल सी ६० च्या जवानांनी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. यामध्ये पाच नक्षलवाद्यांना ठार करण्यात सी ६० च्या जवानांना यश आलं आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये चार महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.

गडचिरोली येथील धानोरा अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र ग्यारापती हद्दीतील कोसमी-किसनेली जंगल परिसरात पोलीस अधीक्षक अंकित गोयल  यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया व पोलीस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले यांच्या नेतृत्वाखाली सी ६० चे कमांडो नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल सी ६० जवानांनी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. सहा नक्षलवाद्यांना ठार करण्यात सी ६० जवानांना यश आले.घटनास्थळी नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 7:42 pm

Web Title: five naxals killed in gadchiroli district during an operation today scj 81
Next Stories
1 शरद पवारांच्या त्या सभेने सिद्ध केलं ‘महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही’-अनिल देशमुख
2 करोनाविरोधात लस येईपर्यंत मास्क हीच आपल्यासाठी लस-उद्धव ठाकरे
3 मला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटही चालेल, पण…; संजय राऊतांचं नाव घेत कुणाल कामराचं ट्विट
Just Now!
X