12 November 2019

News Flash

आत्महत्येस भाग पाडल्यावरून पत्नीसह पाच जणांवर गुन्हा

पत्नीसह  पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

 

कोपरगांव : संगमनेर येथील गिरीश  अशोक अभंग याने कोपरगांव येथे नोकरीस असलेल्या  पत्नीच्या  बंगल्यावर  गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली असून या प्रकरणी त्याच्या पत्नीसह  पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पत्नीच्या अनैतिक संबंधातून गिरीशने आत्महत्या केल्याची फिर्याद मयताचा भाऊ  महेंद्र अशोक अभंग यांनी कोपरगांव शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

या संदर्भात माहिती अशी की,  गिरीशअशोक अभंग याचे लग्न एका तरूणीशी २०१४ मध्ये  चासनळी येथे लग्न झाले.  एक वर्ष कसा बसा संसार चालला  दरम्यान त्यांना आत्मेश नावाचा मुलगाही झाला.गिरीश  यास सासरकडील लोकांकडून त्रास असल्या बद्दल व जीवनाला कंटाळला असल्याबद्दल भाऊ /फिर्यादी महेंद्र अशोक अभंग (रा.संगमनेर ) यास व त्यांचे कुटूंबियांना सांगत असे.  गिरीश  व  त्याच्या पत्नीने संमतीने घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केला त्याप्रमाणे  सदर घटस्फोटाचा अर्जही मंजुर केला आहे परंतु गिरीश  हा कोपरगांव येथे राहात असल्याने त्याचे शैक्षणिक व इतर महत्वाची कागदपत्रे  पत्नीच्या  ताब्यात होती. तिने  घटस्फोटाच्या  अंतिम तारखेवेळी कोर्टात कागदपत्रे आणली नाही  फ्लॅटवर  येवून कागदपत्रे घेवून जा असे सांगितले तेथे गेला असता नंतर  गिरीशचा फोन आला नाही  नंतर  पत्नीच्या राहत्या घरी गिरीशने गळफास घेवून आत्महत्या  केल्याचे लक्षात आले.या प्रकरणी पत्नीसह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

First Published on October 15, 2019 1:05 am

Web Title: five people wife commit suicide akp 94