14 August 2020

News Flash

गृहमंत्र्यांचा वाहन ताफा अडवण्याचा प्रयत्न करणारे ताब्यात

जाणून घ्या, नेमकं काय होतं कारण

राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये दलितांवरील अत्याचार पुन्हा वाढल्याचा आरोप करत, या प्रश्नी लक्ष वेधण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा वाहन ताफा सोलापुरात अडविण्याचा प्रयत्न युवा पँथरच्या कार्यकर्त्यांनी केला. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून पाचजणांना ताब्यात घेतले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे व पालकमंत्री दत्तात्रेय भरणे हे शनिवारी सोलापुरात करोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आले होते. दुपारी तीनच्या सुमारास हे तिन्ही मंत्री मोटारीतून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आले असता, तेथे अचानकपणे युवा पँथरचे कार्यकर्ते अतिश बनमोडेव, सत्यजित वाघमोडे आदींनी दलित अत्याचाराच्या निषेधार्थ घोषणा देत, मंत्र्यांच्या वाहनांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी संबंधित पाच जणांना ताब्यात घेतले. दरम्यान, गृहमंत्री येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयासह शासकीय विश्रामगृहात पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2020 6:17 pm

Web Title: five person arrested who attempt to block the home ministers vehicle convoy msr 87
Next Stories
1 धक्कादायक : बनावट शैक्षणिक प्रमाणपत्राच्या आधारे तब्बल ३२ वर्षे केली शिक्षकाची नोकरी
2 पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे २९ जून रोजी आंदोलन
3 चंद्रपूर : मानद वन्यजीवरक्षक नियुक्तीत घोटाळा?, असंख्य अर्ज बाद केल्याचा आरोप
Just Now!
X