19 September 2020

News Flash

इकबाल कासकरला व्हीआयपी वागणूक देणाऱ्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन

इकबाल कासकर एका खासगी गाडीत बसून बिर्याणी खात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे

इकबाल कासकर ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

खंडणीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला विशेष वागणूक देणाऱ्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबन करण्यात आलेल्यांमध्ये एक पोलीस उपनिरीक्षक आणि चार कॉन्स्टेबलचा समावेश आहे. इकबाल कासकर एका खासगी गाडीत बसून बिर्याणी खात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

उपनिरीक्षक रोहिदास पवार, कॉन्स्टेबल पुंडलिक काकडे, विजय हालोरे, कुमार पुजारी आणि सुरज मानवार यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासकर सध्या ठाणे मध्यवर्ती कारागृहात असून गुरुवारी त्याला ठाणे सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आलं होतं. यावेळी हा प्रकार घडला.

व्हायरल झालेल्या व्हिडीओची गंभीर दखल घेत ठाणे पोलिसांनी चौकशी करत कासकरला ठाणे कारागृहातून ते रुग्णालयापर्यंत नेणारे पोलीस कर्मचारी यासाठी जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढत निलंबनाची कारवाई केली. चौकशीदरम्यान रोहिदास पवार आणि त्यांच्या टीमने कासकरला विशेष वागणूक दिली असल्याचं समोर आलं.

सहपोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी निलंबनाची कारवाई करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इकबाल कासकर याला ठाणे पोलीस खंडणी विरोधी पथकाने खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली होती. प्रदीप शर्मा यांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 11:12 am

Web Title: five police suspended for giving preferable treatment to iqbal kaskar
Next Stories
1 दिवाळीचा गोडवा महाग!
2 ठाण्यात सरसंघचालकांच्या स्वागतासाठी शिवसेना नेते दक्ष
3 ठाण्यातील बाजारांत आज कोंडी?
Just Now!
X