10 July 2020

News Flash

अपंग-मतिमंद मुलीवर पाच नराधमांकडून बलात्कार

पीडित पाच महिन्यांची गरोदर, सर्व आरोपींना अटक

प्रतिनिधिक छायाचित्र

आरमोरी तालुक्यातील अपंग व मतिमंद १९ वर्षीय मुलीवर पाच नराधमांनी वेगवेगळय़ा ठिकाणी नेऊन एका वर्षांपासून बलात्कार करीत असल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पीडित पाच महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले आहे.

फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून पीडितेवर मागील एक वर्षांपासून विकलांगतेचा फायदा घेऊन नराधमांनी वेगवेगळय़ा ठिकाणी नेऊन अत्याचार केला. या बलात्कार प्रकरणात एकूण पाच आरोपी आहेत. या पाचही आरोपींनी वेगवेगळय़ा वेळेस पीडितेला एकटे गाठून चॉकलेट व पैशाचे आमिष दाखवून वेगवेगळय़ा ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणाची वाच्यता केली तर ठार मारण्याची धमकी दिली. मुलीला तिच्यासोबत नेमके काय होत आहे हे कळत नव्हते. दरम्यान, मतिमंद मुलगी पाच महिन्याची गरोदर राहिल्याने घरच्यांनी वैद्यकीय तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी आरमोरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बलात्कार प्रकरणातील देविदास मनीराम कुमरे (३५, रा. कुकडी, ता. आरमोरी), दिगंबर विश्वनाथ दुर्गे (५२, रा. विहीरगाव, ता. आरमोरी), विजय गजानन कुमारे (२९, रा. कुकडी, ता. आरमोरी), सुधाकर तुळशीराम कुमोटी (४५, रा. कुकडी, ता. आरमोरी), मेघशाम नामदेव पेंदाम (२४, रा. वडधा, ता. आरमोरी), अशी आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपींवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. आरमोरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी पंकज बोडसे, केतन चव्हाण तपास करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2020 1:04 am

Web Title: five rapists raped a disabled woman abn 97
Next Stories
1 ‘नाणार’साठी ७० टक्के जमीनमालकांच्या संमतीसह सुधारित प्रस्ताव
2 संशोधन होऊनही शेतकऱ्यांचे उत्पन्न कमीच
3 आमदार रत्नाकर गुट्टेंसह बँक व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा; फसवणुकीद्वारे २५ लाखांचे कर्ज उचलले
Just Now!
X