03 March 2021

News Flash

बीएनएचएसचा २८ फेब्रुवारीला मुंबईत फ्लेमिंगो उत्सव

पक्ष्यांचा अभ्यास, त्यावरील संशोधन, त्यांचे संवर्धन आणि संरक्षणासाठी कार्यरत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) च्यावतीने आणि मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सहकार्याने येत्या २८ फेब्रुवारीला फ्लेमिंगो उत्सव

| February 21, 2015 03:33 am

पक्ष्यांचा अभ्यास, त्यावरील संशोधन, त्यांचे संवर्धन आणि संरक्षणासाठी कार्यरत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) च्यावतीने आणि मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सहकार्याने येत्या २८ फेब्रुवारीला फ्लेमिंगो उत्सव आयोजित करण्यात आला आहे. मुंबईतील शिवडी येथे त्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून शिवडी जलाशयावर फ्लेमिंगोंचे थवे हजारोंच्या संख्येने येतात. स्थलांतरित फ्लेमिंगोंच्या येथील सातत्याच्या वास्तव्याने शिवडी जलाशय फ्लेमिंगो अभयारण्यासाठी प्रस्तावित आहे. मुंबईव्यतिरिक्त पुणे जिल्ह्य़ातील उजनी जलाशय, औरंगाबाद जिल्ह्य़ातील जायकवाडी, सुखना जलाशयावरही फ्लेमिंगोंचे वास्तव्य आहे.
२३ फेब्रुवारीला फ्लेमिंगो पिकथॉनअंतर्गत फ्लेमिंगोंचे छायाचित्र, तारीख, ठिकाणासह टाकायचे आहे. २४ फेब्रुवारीला फ्लेम-अ-टून्सअंतर्गत सहभागी होणाऱ्याला आवडत्या फ्लेमिंगोचे कार्टून त्या कार्टून निर्मात्याच्या मंजुरीपत्रासह टाकायचे आहे. २५ फेब्रुवारीला फ्लॅम-अ-फ्रेसअंतर्गत फ्लेमिंगोवरील वाक् प्रचार पाठवायचे आहेत. २६ फेब्रुवारीला ऑनलाईन प्रदर्शनाअंतर्गत फ्लेमिंगोचे प्रदर्शन पाहता येणार आहे. २७ फेब्रुवारीला फ्लॅम-अ-क्विज अंतर्गत फ्लेमिंगोवर आधारित प्रश्न विचारण्यात येणार असून विजेत्याला फ्लॅमक्विन/फ्लॅमकिंग असा किताब देण्यात येईल. या उत्सवाच्या अधिक माहितीसाठी बीएनएचएसकडे ०२२-२२८२१८११ या दूरध्वनी क्रमांकावर सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.३० ते ५.३० पर्यंत संपर्क साधावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2015 3:33 am

Web Title: flamingo festival in mumbai
टॅग : Flamingo
Next Stories
1 निम्मी कारागृहे कार्यअहवालाबाबत बेफिकीर
2 विज्ञान, तंत्रज्ञानातील यश हे भारताच्या प्रगतीचे द्योतक
3 गुंडाकडून फौजदाराला पट्टय़ाने मारहाण
Just Now!
X