News Flash

चिपळुणात महापूर

एनडीआरएफच्या तुकड्या संध्याकाळी चिपळुणात पोचल्या आहेत.

रत्नागिरी/चिपळूण  : बुधवारी रात्रभर पडलेला पाऊस, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग आणि समुद्राला आलेली भरती, अशा तीन घटना एकाच कालावधीत घडल्यामुळे गुरुवारी चिपळूण शहर शब्दश: जलमय झाले. सुमारे १६ वर्षांपूर्वी, २६ जुलै २००५ घ्या महापुरापेक्षाही निसर्गाचा मोठा प्रकोप चिपळूणकर अनुभवत असून शहरातील बहुसंख्य इमारतींचे तळमजले पाण्यात बुडाले आहेत. काही ठिकाणी तर पहिल्या मजल्यावरही घरांमध्ये तीन ते चार फूट पाणी भरले आहे.

एनडीआरएफच्या तुकड्या संध्याकाळी चिपळुणात पोचल्या आहेत. घरांमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरचीही मदत घेतली जात आहे.

गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत तालुक्यात तब्बल २०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने शहरातील अनेक भागात पाणी साचले असून अंतर्गत मार्ग बंद झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2021 1:40 am

Web Title: flood in chiplun heavy rain fall akp 94
Next Stories
1 अमरावती विभागात पूरस्थिती
2 अकोला जिल्हय़ात अतिवृष्टीमुळे हाहाकार
3 रस्त्याच्या मधोमध असलेल्या झाडांचा मुद्दा आता पालकमंत्र्यांच्या दारी
Just Now!
X