News Flash

पूरग्रस्तांना एसडीआरएफच्या निकषानुसार तातडीची मदत दिली जाणार – एकनाथ शिंदे

मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला असल्याची देण्यात आली माहिती

पूरग्रस्तांना एसडीआरएफच्या निकषानुसार तातडीची मदत दिली जाणार – एकनाथ शिंदे
(संग्रहीत छायाचित्र)

राज्यातील पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा आजच्या मंत्रिमंडळ बैठीकत घेण्यात आला. या बैठकीत विविध निर्णय़ घेण्यात आले असून, पूरग्रस्त भागातील नुकसानग्रस्तांच्या मदतीसंदर्भातही निर्णय घेतला गेला आहे. त्यानुसार आता सुरूवातीला एसडीआरएफच्या निकषानुसार तातडीची मदत दिली जाणार आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, आता सुरूवातील तातडीची मदत म्हणून दहा हजार रुपये रोखीने मदत देण्याचा निर्णय झाला आहे आणि उर्वतरीत मदत एसडीआरएफच्या निकषांप्रमाणे घराचं किंवा आणखी काही नुकसान असेल, ही सगळी मदत एनडीआरएफच्या निकषानुसार दिली जाईल.

तसेच, नुकसानीचे एकूण आकडेवारी आल्यानंतर व पूर्ण आढावा आल्यानंतर अधिकची मदत देण्याबाबत निर्णय घेण्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली आहे. अशी देखील एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे.

याचबरोबर, क वर्ग आणि ड वर्ग महापालिका, नगरपालिका व नगरपंचायती यामध्ये काम करणाऱ्या ज्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू कोविडमुळे झालेला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय शासनाच्यावतीने घेण्यात आलेला आहे. असं देखील मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2021 8:32 pm

Web Title: flood victims will be assisted as per ndrf norms eknath shinde msr 87
Next Stories
1 पालकांना मोठा दिलासा!; खासगी शाळांची फी १५ टक्के कमी होणार
2 महाडमध्ये NDRF चा कायमस्वरूपी बेस कॅम्प उभारण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक – आदिती तटकरे
3 अनिल देशमुखांच्या मागे ‘सीबीआय’चा ससेमिरा; मुंबई, पुण्यासह १२ ठिकाणी धाडी
Just Now!
X