वारंवार त्याच गावात-वाडय़ात दरवर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते हे योग्य नाही.  याबाबत संबंधित सर्व यंत्रणांनी टंचाई निर्माण होणाऱ्या गावे – खेडय़ात ठोस उपाययोजना राबवून पिण्याच्या पाणी टंचाई बाबत कायमस्वरूपी उपाययोजनेवर भर द्यावा, अशी सूचना पालकमंत्री दिपक केसरकर यांनी येथे आयोजित पाणी टंचाई आढावा बठकीत केली.

या बठकीत खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड तसेच जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

ज्यांना वाडय़ांवर बोअरवेल मशिन जाऊ शकत नाही अशा ठिकाणी सार्वजयनिक बांधकाम विभागाने तात्पुरता रस्ता करून द्यावा, िवधन विहीरीचे अयशस्वीतीचे प्रमाण पाहता िवधन विहीरी ऐवजी अन्य योजना प्रस्तावित करावी, मालवण नगरपालिकेने स्वातंत्र बावीस कोटी रूपयांची  पाणी  योजना प्रस्तावित न करता याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाणी योजनेबाबत मागणी नोंदवावी, वैभववाडी ते दोडामार्ग या सह्य़ाद्री पट्टय़ात उन्हाळी दिवसांतही जिवंत पाण्याचे झरे यांचा अखंड स्त्रोत उपलब्धआहे. याचे सर्वेक्षण करून योजना प्रस्तावित कराव्यात, कसाल येथून अनधिकृत पाणी उपसाबाबत संबधित उपविभागीय अधिकारी यांनी आठ दिवसांच्या आत कारवाई करावी अशा सूचना पालकमंत्री दिपक केसरकर यांनी या बठकीत केल्या.