राज्यातील टंचाईकाळातील सवलती ३१ जुलैपर्यंत
राज्यातील बहुतांश भागात आतापर्यंत समाधानकारक पाऊस पडला असून, २७७ तालुक्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. धरणांच्या पाणी साठय़ातही झपाटय़ाने वाढ होत असून, कोकणातील धरणे तर भरण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, पुरेसा पाऊस पडत नाही तोपर्यंत जनावरांच्या छावण्या आणि टँकर सुरूच ठेवण्याचा तसेच टंचाई काळातील सवलती ३१ जुलपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
राज्यात यावेळी जुल महिन्याच्या सरासरीच्या १४४ टक्के पाऊस झाला आहे. केवळ एका तालुक्यात २५ ते ५० टक्के, १७ तालुक्यांत ५० ते ७५ टक्के आणि ६० तालुक्यात ७५ ते १०० टक्के पाऊस झाला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, जालना, नांदेड, परभणी, िहगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या २७ जिल्’ाात १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
 मराठवाडय़ातील धरणांमध्ये मात्र अद्यापही पुरेसा पाणी साठा झालेला नाही. जायकवाडी, पूर्णा येलदरी, पूर्णा सिध्देश्वर, माजलगाव, मांजरा, निम्नदूधना, सिना कोळेगाव या प्रकल्पांमध्ये अद्यापही उपयुक्त पाणी साठा नाही. केवळ उध्र्व पेनगंगामध्ये ३४ टक्के पाणी साठा असून, विष्णूपुरी प्रकल्पात ५१ टक्के पाणी साठा आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठय़ात चांगली वाढ झाली आहे. मोडक सागर तलावात ७९ टक्के, तानसा ७१टक्के, विहार ५०टक्के, तुळशी ८८ टक्के  तर बारवीमध्ये ६३ टक्के पाणी साठा आहे. पाऊस पडत असला तरी आजही २२०९गावे आणि ८०५९ वाड्यांना २८९७ टँकर्सने पाणी पुरवठा केला जात असून तो पुढेही चालू ठेवण्यात येणार आहे.

पाणीसाठय़ांमध्ये झपाटय़ाने वाढ
विविध जलाशयात पाणी साठय़ात झपाटय़ाने वाढ होत असून, सध्या ३४ टक्के पाणी साठा झाला आहे. कोकणातील धरणे ७१ टक्के भरली आहेत. (गतवर्षी याच दिवशी ४० टक्के).याचप्रमाणे मराठवाडा ८ टक्के (गतवर्षी ५ टक्के), नागपूर ५१ टक्के(गतवर्षी २१ टक्के), अमरावती ४४ टक्के (गतवर्षी २० टक्के), नाशिक १५ टक्के (गतवर्षी १० टक्के), पुणे ३४ टक्के (गतवर्षी १३ टक्के). तर इतर धरणांमध्ये सध्या ५४ टक्के  पाणीसाठा (गतवर्षी २४ टक्के झाला आहे.