News Flash

‘चारा छावण्या बंद केल्यास शिवसेना रस्त्यावर उतरणार’

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने जनावरांच्या चारा छावण्या सुरू केल्या

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने जनावरांच्या चारा छावण्या सुरू केल्या आणि काही दिवसांतच छावण्या बंद करण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयाचा निषेध करतानाच छावण्या बंद केल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी परंडा येथे दिला.
नगरपरिषदेच्या सभागृहात माजी आमदार पाटील यांनी पत्रकार बैठकीत सांगितले, की सरकारने दुष्काळग्रस्त बीड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांतील चारा छावण्या बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा अन्यथा शिवसेनेतर्फे परंडा तालुक्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल. सरकारचा हा निर्णय चुकीचा आहे. तालुक्यातील २० हजारांहून अधिक जनावरे छावण्यांत असून चारा छावण्या बंद केल्यास जनावरे चारा पाण्याअभावी तडफडून मरतील. रब्बी हंगामातील चारा शेतकऱ्यांकडे तीन महिने पुरेल इतका उपलब्ध आहे, अशी चुकीची माहिती सरकारकडे आहे.
परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांकडे चाराच नाही. रब्बी पेरणी करून त्याची उगवण झाली नाही. मग चारा आला कोठून? अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली आहे. या अधिकाऱ्यांचा निषेध शिवसेना करीत आहे. परंडा तालुक्यातील चारा छावण्या छावणीचालकांनी बंद करू नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पाटील यांनी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2016 12:04 am

Web Title: fodder camp shiv sena
टॅग : Fodder Camp
Next Stories
1 ‘शैक्षणिक सुविधांअभावी मुस्लिम तरूण दहशतवादाकडे’
2 क्रौंच पक्ष्यांना शिकाऱ्यांचा फास!
3 मासेमारी बंदीवरून राजकारण तापले
Just Now!
X