वाशी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा झाली. बाधित विद्यार्थ्यांवर वाशी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, घटनेचे वृत्त कळताच शहरातील नेते, पालक यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली.
प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. यात प्रत्येक गुरुवारी विद्यार्थ्यांना खिचडीसोबत बिस्किटे, चिक्की किंवा इतर पोषक पदार्थ दिले जातात. गुरुवारी सकाळी ११ वाजता पाचवी व सातवीतील १७३ विद्यार्थ्यांना नानकटाई नावाचे मद्याचे बिस्कीट वाटप करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी हे बिस्कीट खाल्ले व अध्र्या तासानंतर विद्यार्थ्यांच्या पोटात दुखू लागले. पोटात मळमळ होऊ लागली. उलटय़ाही झाल्या व डोके दु:खू लागले. यानंतर विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकूण १५० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. विषबाधा झालेल्यांपकी ११ विद्यार्थ्यांना जास्त त्रास झाल्याने त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. उर्वरित १३९ विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना गोळय़ा दिल्या व डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले.
दरम्यान, घटनेचे वृत्त कळताच परंडय़ाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, शिक्षणाधिकारी प्राथमिक उकरंडे, तहसीलदार रामेश्वर गोरे, नायब तहसीलदार बी. डी. कसबे, वाशी पंचायत समिती सभापती लक्ष्मीकांत आटुळे, उपसभापती संतोष िशदे, वाशी गटशिक्षणाधिकारी कादर शेख, अन्न व औषध प्रशासन अधिकारी न. त. मुजावर यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली. संस्थेचे सहसचिव शितोळे जयकुमार, समाजसेवक दादा चेडे यांनीही भेट दिली.
कोण काय म्हणाले?
– कंपनीची बिस्किटे देणे शाळेची जबाबदारी. कंपनीची बिस्किटे न देता खासगी बिस्किटे दिल्याने विषबाधेची घटना घडली.- यशस्विनी अभियानच्या राज्य समन्वयक वैशाली मोटे.
– पोषण आहार बनविणाऱ्या महिलांची तक्रार शहरातील पुढाऱ्यांकडे केली होती, पण तक्रारीकडे दुर्लक्ष केले गेले.- छ. शि. विद्यालयाचे मुख्याध्यापक लोखंडे.