News Flash

मिरजमध्ये ७३ जणांना वास्तुशांतीच्या जेवणातून विषबाधा

पोलिसांकडून अन्नाचे नमुने घेण्यात आले असून प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल

मिरजमधील भोसे गावात जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला. विषबाधा झालेल्या ७२ जणांना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजत आहे. याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या वास्तुशांतीच्या भोजन कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ हालचाली करत विषबाधा झालेल्यांना रुग्णालयात हलविले. त्यामुळे मोठी जिवीतहानी टळली. दरम्यान, सध्या पोलिसांकडून अन्नाचे नमुने घेण्यात आले असून प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2015 11:25 am

Web Title: food poisoning incident happened in miraj maharashtra
टॅग : Maharashtra,Mishap
Next Stories
1 मंत्री राठोड यांच्या मतदारसंघात शेतकऱ्याची आत्महत्या
2 शिवप्रतापदिन उत्साहात साजरा
3 राज्यात २ कोटी ३० लाख पोती साखरेची निर्मिती
Just Now!
X