मुंबई शहराच्या प्रवेशद्वारातील पथकर नाक्यांचे कंत्राट ३० सप्टेंबर २०२७ पर्यंत असून ते रद्द करण्यासाठी कोणतेही कायदेशीर कारण नाही, असे सावर्जनिक बांधकाममंत्री एकनाथ िशदे यांनी विधानसभेत लेखी उत्तरात नमूद केले आहे. मात्र पथकर रद्द करण्यासंदर्भात विचार करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिवांचा अहवाल लवकरच अपेक्षित असून त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे िशदे यांनी स्पष्ट केले. या संदर्भात संदीप नाईक, सुनील प्रभू आदींनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. कंत्राटदाराला ऑगस्ट २०१५ पर्यंत १३६२ कोटी ५९ लाख रुपये वसुली झाल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. पथकर रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे िशदे यांनी सांगितले.

आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या सानुग्रह अनुदानावरून गदारोळ
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानावरून विधान परिषद चार वेळा तहकूब करण्यात आली. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यावरून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह सदस्यांनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाच्या उत्तरात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना एक रुपया सानुग्रह अनुदान देण्यात येते, असे छापून आले आहे. महसूलमंत्र्यांनी माफी मागेपर्यंत कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका विरोधकांनी घेतली.

गाईंना मुंबईत संरक्षण द्यावे;
तारासिंह यांची मागणी
िहदू धर्मात पवित्र असलेल्या गोमातांना मंदिरांसमोरून हटविले जात असून त्यांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी भाजप आमदार सरदार तारासिंह यांनी विधानसभेत राज्य सरकारकडे केली.
शहरात मंदिरांपुढे गाई बांधलेल्या असतात व भाविक त्यांना चारा देतात; पण महापालिका आयुक्तांनी त्यांना हटविण्याचे आदेश दिल्याने पालिका कर्मचाऱ्यांनी कारवाई सुरू केली आहे. या गाई वर्षांनुवष्रे मंदिरांपुढे आहेत. गाई हटविल्यास त्यांचे पोषण करता येणार नाही आणि गुराख्यांवरही हलाखीची परिस्थिती येईल. त्यामुळे आयुक्तांना कारवाई न करण्याचे आदेश देण्याची मागणी तारासिंह यांनी केली.

राज्य सरकारची धोरणे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करत काँग्रेस आमदारांनी शुक्रवारी नागपूर येथे विधानभवन परिसरात निदर्शने केली.