02 March 2021

News Flash

सुरक्षेच्या कारणास्तव विधिमंडळ अधिवेशन घेतलं आटोपतं

पाकिस्तानबरोबरील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ अधिवेशन आटोपते घेतले आहे.

संग्रहित छायाचित्र

पाकिस्तानबरोबरील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाचे अधिवेशन आटोपतं घेतलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला गेला आहे. सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत एकमताने हा निर्णय झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विधिमंडळात घोषणा केली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षाचे आभारही मानले. हा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.  दरम्यान, या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. अधिवेशन गुंडाळणे म्हणजे पळपुटेपणा असल्याचे ते म्हणाले. अधिवेशन स्थगित करण्यास आमचा विरोध असल्याचेही त्यांनी सांगितले.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. त्यातच सुरक्षा आढावा बैठकीत अधिवेशन संपवण्याबाबत चर्चा झाली होती. अधिवेशन काळात सर्व मंत्रिमंडळ आणि राज्यभरातील आमदार विधानभवन परिसरात असतात. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर याचा ताण येतो. सर्वच महत्वाचे व्यक्ती येथे असल्याने हा परिसर जास्त संवेदनशील असतो.

या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत अधिवेशन आटोपते घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तर दुसरीकडे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारचा हा पळपुटेपणा असल्याचा आरोप केला. एकीकडे मोदी देशभरात फिरतात, सभा घेतात. त्यांना संरक्षण लागत नाही का, असा सवाल करत हे नाटक बंद करा. आपला विंग कमांडर पाकिस्तानात आहे आणि आपण पळपुटेपणा करत आहोत, असे त्यांनी म्हटले.

काय म्हणाले मुख्यमंत्री..

मंगळवार आणि बुधवारपासून सीमेवर तणाव आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. देशात हायअलर्ट जारी केला आहे. अशावेळी मुंबईत नेहमीपेक्षा जास्त निगराणी राहिली पाहिजे असे पोलीस विभागाचे म्हणणे आहे. तणावाची स्थिती नाही पण अशावेळी काळजी घेणे महत्वाचे आहे. हे अधिवेशन आणखी २ ते ३ दिवस चालणर होते. पण सुमारे ६ हजार पोलीस अधिवेशन काळात कार्यरत असतात. अधिवेशनासाठी विविध आंदोलने होत असतात. नेहमीपेक्षा जास्त गर्दी असते. यातच पोलीस व्यस्त राहतात. पोलीस अधिकाऱ्याची याबाबत विस्तृत माहिती दिली. त्यावर विचार करून आज सर्वपक्षीय बैठकीत सर्वानुमते अधिवेशन आटोपते घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलिसांना अतिरिक्त बळ उपलब्ध करुन देण्यासाठी हा निर्णय घेतला. विरोधी पक्षांनी यासाठी सहकार्य केल्याने त्यांचे आभार, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2019 11:38 am

Web Title: for security reason the legislature session on maharashtra assembly closed
Next Stories
1 काश्मीरमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत नाशिकच्या वैमानिकाचा मृत्यू
2 वर्धेची जागा ‘स्वाभिमानी’स देण्यास शरद पवारांचा पुढाकार
3 भाजपपासून आमदार पवार, राष्ट्रवादीपासून क्षीरसागर दूर
Just Now!
X