24 October 2020

News Flash

दुष्काळ निवारणासाठी उदयनराजेंचे शुक्रवारी तुळजा भवानीला साकडे

खासदार उदयनराजे भोसले शुक्रवार तुळजापूर येथे भवानी मातेला साकडे घालणार आहेत.

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्रावर पाऊस पाणी, दुष्काळ, शेतकरी, कामकरी ,रोजंदारी,उद्योग यामुळे आलेलं दुष्टचक्र निवारणासाठी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजाभवानीचा आशीर्वाद घेवून स्वराज्याची स्थापना केली होती. त्याच राज्यातील रयत आता पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडली आहे या संकटाचा सामना करण्याचे बळ देण्यासाठी व या दृष्टचक्रातून सुटका करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले शुक्रवारी तुळजापूर येथे भवानी मातेला साकडे घालणार आहेत.

तिसर्‍यांदा खासदार झाल्यानंतर सगळ्याच्या जेष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी -चर्चा,दुष्काळी भागाला शरद पवार यांच्यासह भेटी,बारामतीला गोविंदबाग येथील खलबते ,खासदार सुप्रिया सुळे यांच्या सोबत चारा चावण्याचा पाहणी दौरा, दुष्काळ हटविण्यासह – मराठा समाजाला आरक्षणाची मुख्यमत्र्यांना भेटून केलेली मागणी , अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त चौंडी (नगर) येथील भेट , रायगडावरील राज्याभिषेक सोहळा आणि देवदर्शन करण्यामुळे सध्या चर्चेत आहेत. आता जगाचा पोशिंदा संकटांच्या गर्तेत अडकला आहे. त्याला संकटांचा सामना करण्याचे बळ देण्यासाठी छत्रपती शिवरायांचे थेट वंशज खासदार उदयनराजे भोसले तुळजापूर येथे ‘भवानी माता मंदिरात शुक्रवार  रोजी सकाळी सात वाजता साकडे घालणार आहेत. यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उदयनराजेंचे सातारा येथील निवासस्थान जलमंदिरतून करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर उदयनराजे मधील बदलाची सर्वत्र चर्चा मात्र जोरात आहे .

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2019 9:19 pm

Web Title: for the drought relief udaynraje going to tulabagani temple
Next Stories
1 पुढचा मुख्यमंत्री भाजपाचाच असेल-सुधीर मुनगंटीवार
2 ईव्हीएमला दोष देत आपल्या कामाकडे दुर्लक्ष करु नका- अजित पवार
3 उद्या मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता
Just Now!
X