09 August 2020

News Flash

भाजपाच्या माजी आमदाराच्या मुलाचा परभणीत अपघाती मृत्यू 

महागड्या दुचाकीचा चुराडा

भाजपाचे माजी आमदार मोहन फड यांच्या मुलाचा परभणीत शुक्रवारी अपघाती मृत्यू झाला आहे. परभणी शहरातील उड्डाणपुलावर मोहन फड यांचा मुलगा पृथ्वीराज फड याच्या दुचाकीचा अपघातात झाला. अपघातानंतर पृथ्वीराजला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पृथ्वीराज याच्या मृत्यूमुळे फड यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

माजी आमदार मोहन फड यांचा मुलगा पृथ्वीराज फड मुंबईमध्ये शिक्षण घेत होता. राज्यात कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर झाला आहे. त्यामुळे पृथ्वीराज मुंबईहून परभणीला आला होता. शुक्रवारी संध्याकाळी तो आपल्या डुकाटी स्क्रम्बलर (ducati scrambler) बाइकवरून गंगाखेड रस्त्याच्या दिशेनं जात होता. त्यावेळी उड्डाणपुलावर दुचाकीचा अपघात झाला. या अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही.

पृथ्वीराजची दुचाकीचा पुढील बाजूने पूर्णपणे चकनाचुर झाला आहे. हा एवढा गंभीर अपघात नेमका कुठल्या वाहनाबरोबर झाला हे मात्र कुणालाही कळु शकले नाही. कारण घटनास्थळी केवळ दुचाकींच पडलेली होती. त्यामुळे त्या वाहनाचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 12:07 pm

Web Title: former bjp mla mohan phad son dies in an accident parbhani nck 90
Next Stories
1 ‘या’ कारणासाठी लॉकडाउनमध्ये बाळासाहेबांची आठवण अधिक आली : शरद पवार
2 १०५ जागा मिळूनही महाराष्ट्रात भाजपाची सत्ता का नाही? शरद पवार म्हणतात…
3 शरद पवार म्हणाले, शिवसेनेशी वैचारिक मतभेद पण…
Just Now!
X