काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पाहटेच्या सुमारास पार पडला होता. त्यानंतर स्थापन झालेलं सरकार काही तासांच ठरलं होतं. या संपूर्ण घटनाक्रमावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. “त्यावेळी शिवसेना आमच्यासोबत येण्यास तयार नव्हती. परंतु थेट राष्ट्रवादी काँग्रेसकडून आम्हाला सरकार स्थापनेची ऑफर होती आणि थेट राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार नाही,” असं फडणवीस म्हणाले. तसंच त्यावेळी सगळे पाठीत खंजीर खुपसत होते त्यामुळेच अजित पवारांसोबत शपथविधीचा गनिमी कावा केल्याचं ते म्हणाले.

“ज्या वेळी शिवसेना आमच्यासोबत येत नाही असं लक्षात आलं तेव्हा आमच्याकडे काय पर्याय आहेत हे आम्ही पाहिलं. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची थेट ऑफर आम्हाला होती. थेट राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार नाहीत. यासंदर्भात झालेल्या काही बैठकांना मी होतो, तर काही बैठकांना मी नव्हतो. आमच्यात सर्व टोकाच्या चर्चाही झाल्या,” अशी माहिती फडणवीस यांनी दिली. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी याबाबत खुलासा केला. चर्चांनतर राष्ट्रवादीच्या प्रमुखांची भूमिका बदलली. त्यानंतर तीन चार दिवस आम्ही काही चर्चा केली नाही. परंतु त्यानं अजित पवारांनी हे मान्य नसल्याचं सांगितलं. तसंच राज्यात स्थिर सरकार हवं आणि तीन जणांचं सरकार चालणार नाही असंही ते म्हणाले होते. त्यांच्याकडे आवश्यक ती संख्याही होती. त्यामुळे त्यावेळी सरकार स्थापनेचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितलं.

आणखी वाचा- अजित पवारांसोबत घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीचे शिल्पकार अमित शाह होते- फडणवीस

राजकारणात मरून चालत नाही

“आता जेव्हा मागे वळून पाहताना ते निर्णय चुकला असं वाटतं. राजकारणात जगावं लागतं. मरून चालत नाही. त्यामुळे तो गनिमी कावा केला. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला नसता तर आमचं सरकार टिकलं असतं. जेव्हा सगळे मिळून आपल्याला पाठीत खंजीर खुपसतात तेव्हा तत्त्वांना टिकून राहून चालत नाही. त्यावेळी मी अयशस्वी झालो पण ९९ टक्क्यांपर्यंत येऊन अयशस्वी झालो,” असं फडणवीस यांनी नमूद केलं.

आणखी वाचा- “जेव्हा कुणाला माहिती नव्हतं तेव्हा मुख्यमंत्री झालो, पण…”; फडणवीसांनी व्यक्त केली सल

आडनावामुळे भूमिका बदलतात

“फडणवीस आडनाव असल्यामुळे काय भूमिका बदलतात हे मी वेळोवेळी पाहिलं. गेल्या पाच वर्षांमध्ये माझ्यावर हल्ला करण्यासाठी एकच शस्त्र मिळालं. माझ्या जातीशिवाय विरोधकांना काही मिळालं नाही. पण एक गोष्ट आहे, जातीच्या अभिंमानापेक्षा कर्तुत्वाचा अभिमान असला पाहिजे. जात कोणतीही असो ज्याचं कर्तुत्व चांगलं त्याचा अभिमान वाटलाच पाहिजे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा- …तरच भाजपाला राज ठाकरेंसोबत जाणं शक्य; फडणवीसांचा सूचक इशारा

शपथविधीचे शिल्पकार अमित शाह</strong>

“अमित शाह आमच्या पाठीशी कायम उभे असतात. नरेंद्र मोदींकडे प्रत्येक छोट्या गोष्टी नेणं योग्य नाही. ते पंतप्रधा आहे. अजित पवारांसोबत जे काही झालं त्याचे शिल्पकारही तेच होते. ते भक्कमपणे पाठीशी उभे आहेत,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.