News Flash

… तर भांडायचं ठरवलं असतं तरी महाराष्ट्रात फक्त शिवसेना-भाजपा राहिले असते : देवेंद्र फडणवीस

‘साठीचा गझल.. महाराष्ट्राचा' या ‘ लोकसत्ता'तर्फे राबविण्यात येत असलेल्या उपक्रमात ते सहभागी झाले होते.

“आज शिवसेना आणि भाजपा एकत्र असते तर आमच्या समोर भांडायलाही कोणी उरलं नसतं. भांडायचं झालंच तर केवळ शिवसेना आणि भाजपाच राहिले असते अशी परिस्थिती निर्माण झाली असती,” असं मत माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. ‘साठीचा गझल.. महाराष्ट्राचा’ या ‘ लोकसत्ता’तर्फे राबविण्यात येत असलेल्या उपक्रमात माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी सर्वांच्या प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली.

लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना आणि भाजपा एकत्र लढले होते. परंतु विधानसभा निवडणुकांपूर्वी अडीच अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वाटपावरून शिवसेना भाजपाची युती तुटली होती. यावरही फडणवीस यांनी भाष्य केलं. “लोकसभा निवडणुकांपूर्वी शिवसेना आणि भाजपादरम्यान ५०-५० टक्के जागा लढवण्यावर चर्चा झाली होती आणि एकमतही झालं होतं. परंतु राज्यातील मुख्यमंत्रीपदाबाबत आमची कोणतीही चर्चा झाली नव्हती. लोकसभेच्या निवडणुकांनंतर परिस्थिती बदलली. त्यामुळे विधानसभेबाबत चर्चा करताना शिवसेनेनं काही प्रमाणात कमी जागा घेण्याचा प्रस्ताव स्वीकारला. पण त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरला,” असं फडणवीस यांनी सांगितलं.

“युतीबाबतचा घटनाक्रम मी यापूर्वीही सर्वांना सांगितला होता. आम्ही अनेकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आमचे फोनही घेतले नाहीत. आमच्या कोणत्याही मेसेजला त्यांनी उत्तर दिलं नाही. अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्याची घोषणा केल्याशिवाय आम्ही चर्चा करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती. ते राज्यातील कोणत्याही नेत्याशी बोलायला तयार नव्हते अशा परिस्थितीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह येतील आणि मातोश्री समोर उभे राहतील असं काही घडलं नसतं. आम्हीदेखील एक राष्ट्रीय पक्ष आहोत आणि आम्हालादेखील इतर राज्यात सरकार चालवायचं आहे,” असं फडणवीस यांनी बोलताना नमूद केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2020 7:01 pm

Web Title: former cm devendra fadnavis speaks about political condition maharashtra loksatta webinar jud 87
Next Stories
1 निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचं सगळं ठरलं होतं- फडणवीस
2 दोन पोलिसांना करोनाची बाधा; सोलापूर ग्रामीण मुख्यालय प्रतिबंधित
3 वर्धा: विनापरवाना जिल्हा प्रवेश; आठ जणांनी दंड देण्यास नकार दिल्याने गुन्हे दाखल
Just Now!
X