बीडमधील परळी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांची तलवारीने वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली आहे. निवडणुकांच्या रणधुमाळीत हा प्रकार घडल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या हल्याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही, मात्र, राजकीय हेतून हा प्रकार घडला असावा असे सुत्रांकडून कळते. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

सुत्रांच्या माहितीनुसार, माजी नगरसेवक असलेले पांडुरंग गायकवाड हे परळीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका मीनाबाई गायकवाड यांचे पती आहेत. काल (रविवारी) रात्री अचानक काही जणांनी पांडुरंग गायकवाड यांच्यावर तलवारीने हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर वीस पेक्षा अधिक वार करण्यात आले. या भीषण हल्ल्यामुळे गायकवाड यांचा जगीच मृत्यू झाला. या जीवघेण्या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, राजकीय हेतूनेच ही घटना घडली असावी अशी शंका व्यक्त केली जात आहे.

पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी पंचनामा करुन तपासाला सुरुवात केली आहे. गायकवाड हे धनंजय मुंडे यांचे समर्थक मानले जात होते.