22 September 2020

News Flash

माजी मंत्री बळीराम हिरे यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजीमंत्री तथा शिक्षणमहर्षी डॉ. बळीराम वामनराव हिरे (८४) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.

| April 12, 2015 05:44 am

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजीमंत्री तथा शिक्षणमहर्षी डॉ. बळीराम वामनराव हिरे (८४) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा प्रसाद, दोन मुली, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. गांधी कुटुंबियांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जात. काही वर्षांपूर्वी डॉ. हिरे यांच्यावर हृदयाजवळ शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मालेगाव तालुक्यातील निमगाव येथे १६ डिसेंबर १९३१ रोजी जन्मलेल्या हिरे यांनी वैद्यकीय, राजकीय, सामाजिक, सहकार व शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2015 5:44 am

Web Title: former minister baliram hiray died
Next Stories
1 तासगाव पोटनिवडणुकीत ५८ टक्के मतदान
2 भाजपच्या धोरणातून शेतकरी गायब – शरद पवार
3 ‘पॅकेज’मधील गळती रोखणार : मुख्यमंत्री
Just Now!
X