देशभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही झपाट्याने वाढत आहे. सर्वसामान्य जनतेपासून ते करोना योद्ध्यांसह आजीमाजी मंत्री देखील करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते व माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना देखील करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांनी स्वतः फेसबुक पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

“लोक संकटात असतांना नेतृत्वाने घरात बसून चालत नाही. कोविडचे सर्व नियम पाळून देखील लोकहिताची कामे करतांना अखेर कोविडने मला गाठलेच. मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात मी उपचार घेणार असून ईश्वरकृपेने आणि लोकाशिर्वादाने लवकरच यातून बाहेर पडेल. आपल्या सदिच्छा आणि आशिर्वाद हेच माझे बळ आहे.” अशी फेसबुकवर खोतकर यांनी माहिती दिली आहे.

अखेर कोविडने गाठलेच..

लोक संकटात असतांना नेतृत्वाने घरात बसून चालत नाही. कोविडचे सर्व नियम पाळूनदेखील…

Posted by Arjun Khotkar on Sunday, September 13, 2020

शिवाय, माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपआपली टेस्ट करून घ्यावी-घरीच रहा-सुरक्षित रहा शासनाच्या निर्देशानाचे सर्वांनी पालन करावे व सुरक्षित रहावे. असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.